कर्जबाजारी माणूस
जो एक प्रॉब्लेम मधून निघाला की दूसरा दरवाजात उभाच असतो , आणि हे असे नेहमी चालूच आहे.
मी खूप लहान असताना माझे वडील आम्हा तिघा भावंडांना आणि आई यांना सोबत घेऊन आमचे राहते गाव व आमचे नातेवाईक यांना सोडून गावा पासून लांब कामा निम्मत राहू लागलो. माझे बाबा आमचा संभाळ डोक्यावर कुलूफी विकून करायचे.माझे बाबा एक स्वाभिमानी माणूस होते.ज्यांनी आयुष्य मधी कधी कुणा पुढे लाचार नाही झाले.Hosting cloudways
त्यांनी कधीच कुणा कडून कशालीच अपेक्षा नाही केली. त्यांनी नेहमी कामावर लक्ष दिले,
बाबा यांना आई ने खूप साथ दिली माला आठवत नाही की आई तिच्या माहेरी कधी राहयला गेली आहे तिने कधीच बाबांनाचा हात कधीच सोडला नाही ,
आम्ही त्या वेळस बाबा नि भाडे ततवावर घेतलेल्या घरामधी राहायचो.
आम्ही ज्या वेळेस गाव सोडले त्या वेळी मी पहिली मधी शिकत होतो. आम्ही गाव सोडल्या मुळे बाबा नी मला मी लहान असल्या कारणानी मला इकडे परत पहिली मधीच एडमिशन घेतलं.