एक कागदाचं पान असतं...!!

0

 कसं आहे ना? ......


👉 एक कागदाचं

पान असतं...!!


 'श्री' लिहलं, की 

पूजलं जातं ...


 प्रेमाचे चार शब्द 

लिहले, की

जपलं जातं...


काही चुकीचं 

आढळलं, की 

फाडलं जातं...


👉 एक कागदाचं 

पान असतं...!!


कधी त्याला 

 विमान बनवून 

भिरकावलं जातं...


कधी होडी बनवून 

पाण्यात सोडलं जातं...


कधी भिरभिरं बनवून 

वाऱ्यावर फिरवलं जातं...


आणि कधी तर 

 निरुपयोगी म्हणून 

चुरगाळलंही जातं...


👉 एक कागदाचं

पान असतं....!!


जे लेखकाच्या 

 लेखणीला हात देतं...


जे चित्रकाराच्या 

 चित्राला साथ देतं...


जे व्यापाऱ्याच्या 

 हिशोबाला ज्ञात ठेवतं...


आणि हो, 

वकीलासोबत कोर्टात गेलं, 

की साक्षही देतं...


👉 एक कागदाचं

पान असतं.....!!


 पेपरवेट ठेवलं, की 

एकदम गप्प बसतं...


काढून घेतलं, की 

 स्वच्छंदी फिरतं आणि 

कशांत अडकलं, तर

 फडफडायला लागतं...


👉 एक कागदाचं

पान असतं.....!!


ज्यावर बातम्या छापल्या, 

की वर्तमानपत्र बनतं...


प्रश्न छापले, की 

 प्रश्नपत्रिका बनतं...


विवाहाचं निमंत्रण छापलं, 

की लग्नपत्रिका बनतं...


तर कधी आदेश~संदेश

लिहले, की तेच टपालही 

बनतं...


👉 एक कागदाचं

पान असतं....!!


 माणसाच्या जीवनांत

आणि त्यांत खूप

 साम्य असतं...!!


👉 एक कागदाचं

पान असतं...!!

जन्मला आला तर birth certificate असतं

निधन झाला तर Death certificate असतं

एक कागदाचं

पान असतं

🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
Pick any 5 minis for just $39 - perfect for trying, gifting, or glowing anywhere!
To Top